loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शेखर निकम यांच्या आवाहनानंतर, कुंभारखाणी बु. येथे बांधले तीन बंधारे

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - महाराष्ट्रात दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी नुकतीच देवरुख येथे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त सभा घेतली. यावेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या. याच सभेस हजर असणारे माजी सभापती विकास सुर्वे यांनी पंतप्रधान‌ नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकास संकल्पनेतील भुजल साठा आणि वन सवर्धन हा मुद्दा उपस्थित करून जंगल तोडीबाबत प्रशासन व लोक प्रतिनिधी यांचे लक्ष वेधून घेतले होते. आमदारांच्या आवाहनानंतर आपल्या मूळ गावी जाऊन ग्राम मंदिर, जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ मधलीवाडी, महिला बचत गट, एकता ग्रामसंघ आणि ग्रामपंचायत सभांमध्ये पाणी टंचाईबाबत प्रबोधन केले. वेगवेगळ्या स्तरावरून त्यास उत्तम प्रतिसाद मिळून लोकांच्या श्रमदानातून एकाच दिवशी हुंबरठवाडी, मधलीवाडी मधून नळपाणी योजना विहिरीकडे जाणाऱ्या पांगरी ओढ्यावर तीन बंधारे निर्माण करून आमदार शेखर निकम यांच्या आवाहनाला गावाच्या वतीने प्रतिसाद दिला. यावेळी कोंड राई, मधलीवाडी येथील ४२ श्रमजीवी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वतः ग्रामसेवक राहुल चौधरी, एकता ग्राम संघ्याच्या अध्यक्ष्या शलाका सुर्वे, माजी सरपंच वंदना सुर्वे, देशप्रेमी माजी सैनिक, कोकण मराठा मंडळ पुणे ट्रस्टी, मराठा उद्योजक संजय साळवी,दुसरे माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, माध्यमिक विद्यालय चेरमन राजेंद्र कदम, रवींद्र सुर्वे, लघु उद्योजक वाग्या बेटकर, बचत गट सदस्य मालती थेराडे, शिवानी डांगे, सुरेखा सुर्वे, अनघा सुर्वे, सुगंधा शिलकर, देऊळ पुजारी आणि दुग्ध व्यावसायिक मंगेश गुरव, जय भवानी नवरात्रोत्सव अध्यक्ष बळीराम सुर्वे, अभिजित सुर्वे, तानाजी शितप, अजिंक्य सुर्वे, सार्थक शितप, ओंकार सुर्वे, संतोष थेराडे, चैतन्य सुर्वे, वसंत माहीम, ग्रामपंचायत कर्मचारी रुपेश शिंदे, उदय सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, विजय सुर्वे, लक्ष्मण शितप असे एकूण ४२ श्रमजीवींनी भविष्यातील पाणी टंचाई होऊ नये म्हणून बंधारा बांधण्यात महत्वाचे योगदान दिले.

टाईम्स स्पेशल

संजय साळवी यांनी दुपारचे बुधवारचे जेवण तर ग्रामसेवक राहुल चौधरी व लघु उद्योजक संजय सुर्वे यांनी चहा, नाश्ता, थंडा, वडा पाव आदी इतर खर्च कर्तव्य भावनेतून स्वखर्चाने उत्स्फूर्ततेने केला. तिन्ही बंदाऱ्यांना लागणारे ताडपत्री वजा मजबूत प्लास्टिक श्री भैरी भवानी प्रचितगड संस्थांनाचे संचालक व कुंभारखाणी बु गावाचे सामाजिक कार्यकर्ते सतीश सुर्वे यांनी विनामूल्य दिले. अश्या पद्धतीच्या भविष्यातील अनेक उपक्रमाना आपण सतत सहकार्य करत राहू असे विचार या दोघांच्या समवेत व सुजाता संजय साळवी, राजेश्री राजेंद्र कदम, शलाका विकास सुर्वे श्री व वर्षां चौधरी, सतीश सुर्वे यांनी व्यक्त केले. दुपारचे जेवण ८० वर्ष्याच्या जेष्ठ मार्गदर्शिका सुविता सखाराम सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांच्या अनेक महिलांनी केले. निर्माण केलेल्या या बंधाऱ्यांना पाहून अनेकांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि यातून प्रेरणा घेतल्याचे बोलून दाखवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg