खेड (दिलीप देवळेकर) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी आगामी ८ ते ९ महिन्यांचे ठोस नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीवर बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
शेतकऱ्यांना केवळ तातडीची आर्थिक मदत देऊन भागणार नाही, तर पुढील ८ ते ९ महिन्यांसाठी पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर आवश्यक बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ पडू शकतो याचा अंदाज शासनाला आधीपासूनच होता, त्यामुळे त्या दृष्टीने पूर्वतयारी केली गेली आहे. केवळ पावसाच्या प्रमाणावर दुष्काळ ठरणार नाही. कोकणातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत बोलताना राज्यमंत्री श्री कदम यांनी स्पष्ट केले, एखाद्या भागात सरासरी पाऊस केवळ मोजक्या दिवसांत पडला आणि नंतरचे तीन महिने कोरडे गेले, तर तिथे दुष्काळ नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे केवळ पावसाच्या मिलिमीटरची आकडेवारी न पाहता वस्तुस्थिती तपासून दुष्काळग्रस्त भाग निश्चित केला जात आहे.
रत्नागिरीतील तालुक्यांचा समावेश व पंचनाम्याचे आदेश रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर या तालुक्यांसह ज्या-ज्या ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे, त्या सर्व तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, बाधित पिकांचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील ५ ते ६ दिवसांत परतीचा पाऊस न पडल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी शासकीय मदत व भरपाई मिळवून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.