loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसंडे विद्यालयाचे शिक्षक सतीशकुमार कर्ले यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

देवगड (प्रतिनिधी) - जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिराचे शिक्षक सतीशकुमार कर्ले यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती देवगडचे गटशिक्षणाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची, अनुभवाची तसेच शाळा आणि विद्यार्थी विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन शासनस्तरावर या पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्हा व तालुकास्तरावर गठित समित्यांच्या माध्यमातून पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करून कर्ले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

या पुरस्कारामुळे श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे या विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे. कर्ले यांच्या या यशाबद्दल त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg