loader
Breaking News
Breaking News
Foto

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून आंदोलन चिघळणार? रोहित पवारांचा सरकारला इशारा; “निर्णय न घेतल्यास पुणे बंद पाडू”

पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भीमनवार यांच्या राजीनाम्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या बैठकीत राजीनाम्यावर निर्णय न घेतल्यास पुणे शहर बंद पाडू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार हे पुण्यातील एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. एमपीएससीच्या विविध प्रश्नांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून, या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. मात्र, हा राजीनामा स्वीकारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन राजीनामा स्वीकारावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि पुणे बंदची हाक दिली जाऊ शकते, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत ठिय्या दिला आहे.विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. केवळ आश्वासनांवर आंदोलन थांबवले जाणार नाही, तर मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या दोन्ही पार्श्वभूमीवर आज होणारी मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg