loader
Breaking News
Breaking News
Foto

दुचाकी चोरी प्रकरणात सावंतवाडी पोलिसांचा जलद तपास; आरोपीला एक दिवस पोलीस कोठडी

सावंतवाडी - वेत्ये येथून चोरिस गेलेली दुचाकी सावंतवाडी पोलिसांनी जलद गतीने तपास करत अवघ्या दोन तासात शोधून काढली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला दुचाकीसह रंगेहात ताब्यात घेतले. साबाजी उर्फ प्रदीप भिकाजी रावळ आंदुर्ले कुडाळ याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेत्ये येथे हायवेच्या शेजारी असलेल्या एका उघड्या शेडमध्ये फिर्यादी विजय लांडगे यांनी आपली नवीन डिलक्स दुचाकी उभी करून ठेवली होती. ही दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ही दुचाकी वेंगुर्ले निवती येथून संशयित घेऊन निघाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार निवती पोलिसांशी संपर्क साधून दुचाकी टेम्पो मधून घेऊन जाणाऱ्या संशयितांला पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

टाईम्स स्पेशल

अवघ्या दोन तासात चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी चोरट्या सहित ताब्यात घेतली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात साबाजी उर्फ प्रदीप भिकाजी रावळ रा आंदुर्ले कुडाळ याच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस धोत्रे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg