loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण यांना ‘राजकीय प्रेरणादायी पुरस्कार’

खेड (प्रतिनिधी) : शिक्षणमहर्षी, माजी आमदार कै. तू. बा. कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुणबी समाज उन्नती संघ (मुंबई - शाखा खेड) च्या वतीने गुणवंतांचा आणि समाजसेवकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडुरंग चव्हाण यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल ’राजकीय प्रेरणादायी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांचे कार्य प्रभावी, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी असल्याचे आयोजकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सौ. अस्मिता कदम / केंद्रे (माजी जि. प. अध्यक्षा), अनिल नवगणे (अध्यक्ष, कुणबी समाज उन्नती संघ मुंबई), शंकर बाईत (अध्यक्ष, मुंबई-खेड शाखा), कृष्णा आगरे गुरुजी (अध्यक्ष, खेड ग्रामीण), निलेश सांबरे (संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था), सचिन धाडवे (जि. प. सदस्य), सौ. मानसी जगदाळे (जि. प. सदस्या) तसेच कुणबी समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg