काजुर्ली : मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मालगुंड या नामांकित शैक्षणिक संस्थेचा ८६ वा वर्धापन दिन शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांच्या संकल्पनेनुसार, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे कार्य करावे, या अभिनव उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या मालगुंड, जाकादेवी व काजुर्ली येथील शाळांमध्ये करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कै.डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत उत्साहाने पार पाडली. तेजस रमेश देसाई याने मुख्याध्यापक, तर तनया प्रवीण मोहिते हिने पर्यवेक्षिकेची जबाबदारी सांभाळली. तसेच वनराज चंद्रकांत साळवी याने इयत्ता आठवीचा वर्गशिक्षक, पायल प्रशांत साळवी हिने इयत्ता नववीची वर्गशिक्षिका, तर ईश्वरी सुभाष वेले हिने इयत्ता दहावीची वर्गशिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडली.या विद्यार्थ्यांनी दिवसभर विविध विषयांचे अध्यापन करून शिक्षकांची भूमिका यशस्वीपणे निभावली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शिक्षकांच्या कार्याची जबाबदारी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घ्यावी लागणारी मेहनत आणि शिस्तीचे महत्त्व यांची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवून दिला. वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर तसेच जाकादेवी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, संतोष सनगरे आणि वैभव खानोलकर यांनी काजुर्ली प्रशालेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. शाळेच्या एकंदरीत शैक्षणिक कार्याचे तसेच मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक बनून अध्यापन करताना आलेले अनुभव, शिक्षकांच्या कार्याविषयी वाटणारा आदर आणि शिक्षकांच्या मेहनतीची झालेली जाणीव याबाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग, सहाय्यक शिक्षिका परविन तडवी, वर्षा पवार, पल्लवी महाडिक, वैष्णवी पावरी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण करणारा ठरला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.