loader
Breaking News
Breaking News
Foto

वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनविभागाचा पुढाकार; घाटीवडे येथे श्रमदानातून वनराई बंधारे

तिलारी (प्रतिनिधी) - वाढत्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासह वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने वनविभागाच्या वतीने मौजे घाटीवडे येथे श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले. सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या संकल्पनेतून, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे व दोडामार्गचे वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नियतक्षेत्र बांबर्डे अंतर्गत वन सर्वे क्रमांक ११ मध्ये बांबर्डे व घाटीवडे येथील ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हे बंधारे उभारण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविणे, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीतील ओलावा टिकविण्यास मदत होणार असून, वृक्षसंपदा व जैवविविधतेच्या संवर्धनालाही हातभार लागणार आहे. या उपक्रमादरम्यान सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे व वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील यांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेत ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.

टाईम्स स्पेशल

यावेळी वनपाल कोनाळ चंद्रकांत पावसकर, वनरक्षक बांबर्डे शुभम वारके, वनरक्षक केर सुबोध नाईक यांच्यासह बांबर्डे-घाटीवडे येथील मनोहर गवस, प्रवीण देसाई, सूरज गवस, वृषभ देसाई, ओंकार गवस, रुपेश कदम, भूषण देसाई, कैतान लोबो, पीटर फर्नांडिस, रामा पाटीयेकर, गणपत गवस, प्रकाश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वन्यजीवांचे संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि लोकसहभागातून पर्यावरण रक्षणाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg