loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश स्कूलची दमदार कामगिरी, 11 सुवर्णांसह 13 पदकांची कमाई

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा योगासन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत रोटरी स्कूलच्या 4 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 13 पदकांची कमाई केली. यामध्ये 11 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरच्या स्पर्धेत श्री दळवी याने आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर तसेच ट्रॅडिशनल योग प्रकारात 3 सुवर्णपदके, श्लोक दळवी याने आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर यामध्ये 2 सुवर्णपदके, स्पंदन धामणे याने आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर तसेच ट्रॅडिशनल योग तसेच आर्टिस्टिक सिंगल यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्णपदके तसेच शाश्वत धुमाळ याने आर्टिस्टिक पेअर व रिदमिक पेअर यांमध्ये 2 सुवर्णपदके मिळवली.

टाईम्स स्पेशल

वरील सर्व खेळाडूंना योग प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे व शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg