loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड शहरात उद्भवणा-या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेत चर्चा

कोर्लई, (राजीव नेवासेकर) - मुरुडमध्ये ठिकठिकाणी वारंवार उद्भवणा-या पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेत मुख्याधिकारी सचिन बच्छाव व पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा विचारविनिमय करण्यात आला. मुरुड जंजिरा पर्यटनात तसेच शहरातील वाढती वर्दळ पाहाता पार्किंगची समस्या भेडसावत असून त्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात शहरातील पुरकर नाका वन वे फलक लावण्यात, पुरकर नाका ते मशिदी पर्यंत रस्त्यावर माल वाहतूकीचे नियोजन करणे,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरकर नाका भाजी मार्केटची जागा पार्किंग साठी रिकामी करणे, रॉयल स्विट मार्ट ते कल्याणी हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता P-1-P2 चे नियोजन करणे, कर्णिक बंगला ते केणे पाखाडी पार्किंग झोन तयार करणे, नाझरे गल्ली नो पार्किंग तयार करणे, मच्छीमार्केट पार्किंग तयार करणे, त्याठिकाणी नो पार्किंग फलक लावणे, बाजार पेठेतील फुटपाथ वरील हातगाड्या हटवून पार्किंग तयार करणे, रॉयल स्विट मार्ट ते कल्याणी हॉस्पिटल ते पुरकर नाका अशी वन वे (एकेरी) वाहतूक करणे, मारुती नाका ते बिच रोड ते मच्छीमार्केट (मेन) मुख्य रस्त्यावरील नो पार्किंग झोन तयार करणे, व्यापारी वर्गाच्या माल वाहतूक वाहनांना वेळ व जागा ठरवून देणे,राजपूरी आटो रिक्षा करीता स्टॅण्ड ची जागा ठरविणे, मुरुड मार्केट मध्ये पार्किंग करीता नव्याने जागा निर्माण करणे, हॉटेल चालक व व्यापारी दुकानदार यांनी दुकानासमोर वाहने लावण्यात नियोजन करणे तसेच वाहतूक नियमना करीता नगरपालिकेकडून ट्रॅफिक बॉय नेमणूक करण्यात चर्चा विचारविनिमय करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यामुळे शहरातील वारंवार उद्भवणा-या पार्किंग समस्येवर निश्चितच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस निरीक्षक सचिन पवार, वाहतूक पोलीस बठारे, मिनिडोअर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष परवेझ कापसे, व्यापारी संघटना अध्यक्ष जाहिद फकजी व नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg