loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमेश्वर शांतीपीठ येथे विश्वमंगल गोशाळेतर्फे सेवा कार्य, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी मदतीचे आवाहन

रत्नागिरी- रत्नागिरी शहरानजीकच्या सोमेश्वर शांतीपीठ येथे विश्वमंगल गोळाळेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. भारतीय संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोसेवा, गोसंवर्धन आणि मुक्या प्राण्यांप्रती करुणाभाव ही केवळ धार्मिक भावना नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. याच भावनेतून अनुजा विनोद पेठकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सोमेश्वर शांतिपीठ संस्थेच्या माध्यमातून सोमेश्वर येथे कार्यरत असलेली विश्वमंगल गोशाळा सद्य स्थितीत आजारी, जखमी, निराधार आणि रस्त्यावर सोडून दिलेल्या गोवंशाला आधार देण्याचे कार्य करीत आहे. या गोशाळेसाठी शशिकांत सोहनी यांनी पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. वसुबारस या गोमातेच्या पूजनाच्या पवित्र पर्वानिमित्त संस्थेच्या गोसेवेच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विश्वस्त व हितचिंतकांमार्फत करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या, आजारी असलेल्या किंवा निराधार अवस्थेत आढळणार्‍या गोवंशाला सुरक्षित निवारा मिळावा, त्यांना वेळेवर चारा-पाणी, आवश्यक उपचार आणि नियमित देखभाल मिळावी, हा विश्वमंगल गोशाळेच्या कार्यामागील मुख्य उद्देश आहे. सध्या गोशाळेत सत्तरहून अधिक गोवंशाचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक जनावराच्या अन्नाची, निवार्‍याची आणि आरोग्याची काळजी घेणे ही संस्थेसाठी दररोजची महत्त्वाची जबाबदारी आहे. गोवंशाचे संगोपन हे केवळ एका दिवसाचे किंवा एखाद्या उत्सवापुरते मर्यादित काम नाही. ऊन, पाऊस, थंडी, चारा उपलब्धतेतील चढ-उतार आणि उपचारांचा खर्च अशा अनेक परिस्थितींमध्ये या मुक्या जीवांची काळजी सातत्याने घ्यावी लागते. त्यामुळे गोशाळेतील सेवाकार्याला समाजातील दानशूर व्यक्ती, गोप्रेमी आणि सेवाभावी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.

टाईम्स स्पेशल

वसुबारसच्या निमित्ताने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत सोमेश्वर येथील विश्वमंगल गोशाळेत गोपूजन आणि गोसेवाविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात गोमातेचे पूजन, मान्यवरांचे स्वागत, गोमाहात्म्याविषयी माहिती, संस्थेच्या कार्याचा परिचय, भजन, गोसेवेसाठी सहकार्याचे आवाहन आणि प्रसादवितरण असे कार्यक्रम नियोजित आहेत. या निमित्ताने ग्रामस्थ, गोप्रेमी, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी उपस्थित राहून गोमातेचे दर्शन घ्यावे, संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घ्यावी आणि शक्य त्या स्वरूपात गोसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोमेश्वर शांतिपीठ आणि विश्वमंगल गोशाळेच्या वतीने करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg