loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांचा एका दिवसांत सहा रेल्वे स्टेशनचा दौरा विलवडे रेल्वे स्टेशनवर आता सुपरफ़ास्ट रेल्वेगाड्यांना थांबा मिळणार. : आमदार किरण सामंत यांची घोषणा !

लांजा दि.१७ नोव्हेंबर ( संतोष कांबळे) कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लांजा व राजापूर तालुक्यातील जनतेला पुढील सहा महिन्यात चांगले दिवस येणार असून यासाठी लांजा राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी जबरदस्त पुढाकार घेतला आहे. आमदार किरण सामंत यांनी आज एका दिवसांत तब्बल सहा रेल्वे स्टेशनचा झंझावाती दौरा करून चक्क जागेवर लोकांच्या असंख्य समस्या सोडवून दिल्या. विलवडे रेल्वे स्टेशनवर यापुढे सुपर फ़ास्ट रेल्वे गाड्यासुद्धा थांबतील अशी घोषणा केली.लांजा राजापूरचे तडफदार आमदार किरण सामंत यांनी आज एका दिवसांत निवसर,आडवली,वेरवली,विलवडे,सौंदळ आणि राजापूर रेल्वे स्टेशनचा झंझावाती दौरा केला. सहा रेल्वे स्टेशनवर असंख्य नागरिकांनी आमदार सामंत यांना आपापल्या रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. आमदार किरण सामंत यांनी लोकांचे प्रत्येक म्हणणे स्वतः लिहून घेतले. आणि तिथल्या तिथे लोकांच्या सर्व समस्या सोडवून देण्याचा शब्द दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार किरण सामंत यांच्या या दौऱ्यात कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,प्रांताधिकारी, तहसीलदार, एस.टी., सार्वजनिक बांधकाम,वन विभाग,जिल्हा परिषद बांधकाम,महावितरण अशा प्रमुख अधिकाऱ्यांचा लवाजमा उपस्थित होता. त्यामुळे लोकांच्या प्रत्येक प्रश्नांना जागेवरच उपाय काढून आमदार किरण सामंत यांनी आपल्या वन मैन आर्मी पद्धतीने काम करण्याच्या स्टाईलचा प्रत्यय आणून दिला. आमदार किरण सामंत यांनी या दौऱ्यात रेल्वे स्टेशनना जोडणारे अप्रोच रोड,प्लॅटफार्मवरील सुविधा,स्टेशनजवळील वाहन तळ,निवारा शेड बांधकाम,स्टेशनवर महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उभारणी,जलदगती रेल्वेना थांबे,रेल्वे स्टेशनवर आरक्षण कोटा निर्धारित करणे,रेल्वे स्टेशन परिसर सुशोभिकरण करणे,रेल्वे स्टेशन परिसरात झाडे लावणे यासारखी सर्व कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा आमदार सामंत यांनी केली. या दौऱ्यात लांजा सभापती मानसी आंबेकर,शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई,लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप यांच्यासह सेनेचे लोक प्रतिनिधी व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg