loader
Breaking News
Breaking News
Foto

दैवज्ञ हितवर्धक समाजातर्फे रत्नागिरीत २८ पासून जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी (जमीर खलफे) : दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी आयोजित आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२६-२७ चे २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत. येथील दैवज्ञ भवन, पॉवर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार असून, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ वेगवेगळ्या गटांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पुरुष (एकेरी), पुरुष (दुहेरी), महिला (एकेरी), वयस्कर गट, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट यांचा समावेश आहे. सन २०२६-२०२७ या वर्षातील ५ वी स्पर्धा असणार आहे. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक असून, अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द केली जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व खेळाडूंनी आपल्या प्रवेशिका सोमवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासह जमा करणे बंधनकारक आहे. विहित वेळेत न आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना पांढरा रंगाचा टी-शर्ट किंवा पांढरा शर्ट परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुरुष दुहेरी गटाचे सर्व सामने चार बोर्डचे तीन सेट खेळवले जातील. आयोजकांतर्फे खेळाडूकरांकरिता सकाळी नाश्ता व भोजन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व दुहेरी याना उप उपांत्य फेरीपर्यंत रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच विजेते व उपविजेते खेळाडूंकरिता डायमंड ज्वेलरी खरेदीवर पवित्रम कंपनीतर्फे रत्नशिल्प ज्वेलर्समार्फत खरेदीवर रुपये १०,०००/- ची गिफ्ट व्हाउचर्स दिली जाणार आहेत.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी, राज्यस्तरीय पंच मंदार दळवी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून राष्ट्रीय पंच सचिन बंदरकर यांची नियुक्ती झाली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी दैवज्ञ हितवर्धक समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास वीरकर, सचिव धनेश रायकर, खजिनदार गुरुप्रसाद खेडेकर, कार्याध्यक्ष संतोष खेडेकर व कार्यकारी मंडळ तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई , सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg