loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2026-27 पुरस्कार सोहळा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - नाशिक येथे महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक गुहागर तालुक्यातील खामशेत या गावाला मिळाला असून तो पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, अन्न व प्रसाधन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आज देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी खामशेत गावचे सरपंच मंगेश सोलकर यांच्यासोबत सभापती पंचायत समिती गुहागर प्रणव पोळेकर आणि उपसभापती पंचायत समिती गुहागर निलेश सुर्वे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, प्रशासक खामशेत चंद्रकांत कारंडे, साईनाथ बागुल, कृष्णदेव कदम, ग्रामसेवक मोहिरे, साखरी त्रिशूल सरपंच सचिन मस्कर, धोपावे सरपंच आशीर्वाद पावसकर, खोडदे सरपंच प्रतीक पवार आणि पंचायत समिती व ग्रामपंचायतील मधील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg