loader
Breaking News
Breaking News
Foto

२८०० मेगावॅटच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा एल्गार; मंत्री योगेशदादा कदम यांची ग्रामस्थांना सकारात्मक भेट व ग्वाही

दापोली (सागर गोवळे) - अणुऊर्जा प्रकल्पविरोधी संघर्ष समितीची मुंबई कमिटी व कमिटीच्या सभासदांनी दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महसूल व पर्यावरण क्षेत्राशी संबंधित राज्याचे मंत्री महोदय तथा स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांची भेट घेतली. वणौशी तर्फे पंचनदी समाविष्ट गाव दुमदेव कार्यक्षेत्रातील भिवबंदर आघारी येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या २८०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीदरम्यान अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्यावर अतिशय सखोल आणि सकारात्मक चर्चा पार पडली. स्थानिकांच्या तीव्र भावना आणि भूमिकेचा सन्मान करत मंत्री योगेशदादा कदम यांनी स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली की, जर संपूर्ण प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असेल, तर मी स्थानिकांच्या पाठीशी आणि बाजूने ठामपणे उभा राहीन. तसेच, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठा र्‍हास होऊन स्थानिकांच्या तसेच संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याला आणि पर्यायाने जनतेच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार असेल, तर असा प्रकल्प या परिसरात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

टाईम्स स्पेशल

प्रकल्पाची तांत्रिक व इतर सर्वंकष माहिती घेऊन त्याची सर्व बाजूंनी योग्य शहानिशा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपण स्वतःदेखील या प्रकल्पांदर्भात संपूर्ण माहिती गोळा करून आणि वस्तुस्थितीची पडताळणी करूनच आपली पुढील अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघर्ष समितीच्या विनंतीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री योगेशदादा कदम यांनी आगामी ५ नोव्हेंबरपर्यंत गावात आयोजित करण्यात येणार्‍या विशेष सभेसाठी वेळ देण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. या आगामी सभेत ते उपस्थित राहून समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळांसमोर आपली अधिकृत भूमिका सविस्तरपणे मांडणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg