loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगडमधील व्यावसायिकांसाठी ‘AI’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी) - देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित निळकंठ श्रीधर दीक्षित कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी देवगडमधील व्यावसायिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी स्थानीय समितीचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर, शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, दत्ता जोशी, सदस्य डॉ. पुष्कर आपटे, सदस्या अनुश्री पारकर, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निळकंठ श्रीधर दीक्षित संगणक कक्षामध्ये संगणकाचे विविध कोर्सेस संस्थेने सुरू केलेल्या असून त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी असे आवाहनॲड. अविनाश माणगावकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बदलत्या डिजिटल युगात व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि दैनंदिन व्यवसायात AI चा प्रभावी वापर करता यावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याची मूलभूत माहिती, दैनंदिन जीवनातील त्याचे विविध उपयोग तसेच आधुनिक काळात उपयुक्त ठरणाऱ्या नवनवीन AI टूल्सची ओळख करून देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन कामे अधिक सोपी, जलद आणि प्रभावी करण्यासाठी कशा प्रकारे करता येतो, याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले तसेच या कार्यशाळेत Google Lens, ChatGPT, Google Flow आणि Meta AI यांसारख्या विविध AI साधनांची माहिती देऊन त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. सण-उत्सवांसाठी आकर्षक जाहिरात पोस्टर तयार करणे, तयार टेम्पलेट्सचा वापर करणे, व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ तयार करणे तसेच ग्राहकांपर्यंत डिजिटल माध्यमातून प्रभावीपणे पोहोचणे, यांसारख्या विषयांची माहिती सहभागी व्यावसायिकांना देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सहभागी व्यावसायिकाला वैयक्तिक मार्गदर्शन (One-to-One Training) देण्यात आले. स्वतःच्या मोबाईलवर विविध AI साधनांचा वापर करून पोस्टर, टेम्पलेट्स आणि व्हिडिओ तयार करण्याचा प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. त्यामुळे सहभागी व्यावसायिकांना केवळ सैद्धांतिक माहिती न मिळता प्रत्यक्ष व्यवसायात उपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेता आला. आजच्या स्पर्धात्मक युगात कमी वेळेत, कमी खर्चात आणि आकर्षक पद्धतीने व्यवसायाची जाहिरात व प्रसिद्धी करण्यासाठी AI तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. या कार्यशाळेमुळे स्थानिक व्यावसायिकांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या नव्या संधींची ओळख झाली असून, आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी AI चा वापर करण्याचा आत्मविश्वास मिळाला. या वर्कशॉप मध्ये मुग्धा तन्मय जोशी आणि मयुरी दांडेकर यांनी सहभागी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. स्थानिक व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची डिजिटल कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने हे वर्कशॉप उपयुक्त ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg