loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील देवी तुळजाभवानी देवस्थानात बहारदार कार्यक्रम, भाविकांची अलोट गर्दी

रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला असून काल दुसर्‍या माळेला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देवी तुळजाभवानीसमोर सादर करण्यात आले. यावेळी संपूर्ण मंदिर भाविकांनी जणू ओसंडून वहात होते. पारंपारिक रिवाजानुसार सकाळी श्री देवी तुळजाभवानीची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी श्री. विजयराव महादेव सुर्वे व त्यांच्या पत्नी सौ. सुचिता विजयराव सुर्वे या दांपत्याने यजमानपद भूषविले. यानंतर मंदिर सर्व भाविकांना दर्शन व ओटी भरण्यासाठी खुले करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी श्री अनिरुद्ध महाराज उपासना ट्रस्ट, रत्नागिरीच्या सदस्यांनी श्री देवी तुळजाभवानीच्या स्तोत्रांचे पठण केले. सायंकाळी कन्या मेळाव्याचा विलक्षण बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. पटवर्धन हायस्कूलच्या आगाशे विद्यामंदिरच्या शिक्षिका सौ. श्रद्धा राजन बोडेकर यांनी या कन्या मेळा कार्यक्रमासाठी मोठे परीश्रम घेतले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लहानथोर सर्व कलाकारांनी जबरदस्त ताकदीने आदाकारी सादर केली व त्याला सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन दाद दिली. आज मंगळ. दि. १३ ऑक्टो. रोजी सकाळी स्वानंद महिला भजन मंडळ, परटवणे यांचे भजन सादर करण्यात येईल. गायिका सौ. स्मितल टोळे, समीक्षा मुळ्ये, हार्मोनियम पेठे बाई, तबला साथ अथर्व घाणेकर आणि मंडळी. त्यानंतर सायं. ५ ते ७ या वेळेत पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उपवासाचे पदार्थ हा स्पर्धेचा मेनू असून सौ. विशाखा सुर्वे व मंदार जोगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न होतील.

टाईम्स स्पेशल

तसेच मंगळ. दि. १३ ऑक्टो. रोजी दांडीया व गरबा देखील आयोजित करण्यात आला असल्याचे देवस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी श्री देवी तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा व भगिनींनी स्वहस्ते देवीची ओटी भरण्याची संधी घ्यावी असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजे घटस्थापना रवि. दि. ११ ऑक्टो.पासून दसरा मंगळ. दि. २० ऑक्टो. पर्यंत रत्नागिरी येथील या तुळजाभवानी देवस्थानमध्ये सर्व भगिनींना देवीची ओटी स्वहस्ते भरण्याची संधी देण्यात येते. भगिनी आपल्या हाताने देवीची पूजा करुन स्वहस्ते ओटी भरु शकतात. नवरात्रोत्सवाच्या काळात हे तुळजाभवानी देवस्थान स. ८.०० पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी खुले असते. या तुळजाभवानी देवस्थानात स्वहस्ते ओटी भरण्यासाठी येणार्या भगिनींना ओटीचे साहित्य सुलभरित्या मिळावे याकरिता देवस्थानतर्फे नाममात्र सवलतीचे दरात ओटीची व पुजेची तबके देवस्थानात उपलब्ध असतील. त्यामुळे भगिनी वर्गाची फार मोठी सोय होते. भगिनींच्या व भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे ही सुविधा उपलब्ध आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg