loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर पूर्वांचल एक्सप्रेवर राहुल गांधी यांच्या ताफात्यातील ५ गाडयांची एकमेकांना धडक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील किमान पाच गाड्यांची एकमेकांना धडक बसली. प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या गाडीला कोणताही अपघात झाला नाही आणि ते सुरक्षित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही घटना हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक्सप्रेसवेच्या ८९.५ किलोमीटर टप्प्याजवळ घडली. अपघात झालेल्या गाड्या काँग्रेस नेत्याच्या कारच्या मागे चालल्या होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक काँग्रेस नेत्यांची एक खाजगी गाडी ताफ्यात पुढे चालली होती.

टाईम्स स्पेशल

सकाळी साधारण १०.१५ वाजता या गाडीच्या चालकाने काही अज्ञात कारणामुळे अचानक ब्रेक दाबला. यामुळे त्याच्या पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यानंतर ताफ्याने लगेचच सुलतानपूरच्या दिशेने आपला प्रवास पुन्हा सुरू केला, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg