loader
Breaking News
Breaking News
Foto

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोफळवणे ग्रामदैवत श्री मानाई देवी परिसराची ग्रामस्थांनी केली श्रमदानाने साफसफाई

दापोली (प्रतिनिधी) : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोफळवणे ग्रामदैवत श्री मानाई देवी मंदिर परिसराची येथील समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी श्रमदान करत साफसफाई करून अवघा परिसर साफ स्वच्छ केला. सध्याच्या काळात लोक श्रमदान करण्यासाठी पुढे येत नाहीत साध्या आणि कमी वेळेच्या सार्वजनिक कामासाठी सुध्दा मोबदल्याची अपेक्षा केली जाते. मात्र पोफळवणे गाव याला अपवाद ठरले असुन महिला पुरुष मिळून एकशे तीसच्या आसपास लोकांनी दिवसभर श्रमदान करत पोफळवणे ग्रामदैवत श्री मानाई देवी देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गासह देवळासभोवताळचा पुर्ण परिसर तसेच बाजूच्या परिसरात हापुस आंबा लागवडीच्या बागेतील झाडेझुडपे तोडून गवत उपटून सर्व परिसर साफ चकाचक केला. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी एकत्र येत हे श्रमदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील पोफळवणे येथील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्याचे प्रमुख काम हे पोफळवणे येथील श्री मानाई देवी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय जंगम, उपाध्यक्ष महादेव घाणेकर, सचिव मनोहर पिंपळकर, उपसचिव संदिप भडवळकर, खजिनदार दिपक मोरे, उप खजिनदार सखाराम चिनकटे, संतोष घाणेकर, काशिराम बारे, महेश बुरटे, अजय म्हसकर, अनंत कुडवस्कर, काशिराम बेंडकर, बाबु घाणेकर, पांडुरंग शिगवण, राजाराम नाचरे, बालकृष्ण मोरे आनंदा मोरे, अनंत जंगम, महिला मंडळाच्या बयो घाणेकर, आंज्या मोरे, मंदा बेंडकर, कमल भडवळकर, जनी नाचरे आदींच्या मार्गदर्शनाखाली अखंड गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी स्वच्छतेची मोहीम राबवत देवालयाचा परिसर साफ स्वच्छ केला. या त्यांच्या स्तुत्य सामाजिक कामाचे बत्तीस गावात समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg