loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ दशावतारी कलाकार जीजी चोडणेकर यांचे निधन; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण (प्रतिनिधी) : कोकणच्या पारंपरिक दशावतार नाट्यकलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, देवबाग येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार महादेव सहदेव उर्फ जीजी चोडणेकर (वय ८१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. देवबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जीजी चोडणेकर यांनी तब्बल सहा दशके दशावतार कलेची सेवा करत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जाबुवंतासह विविध पौराणिक आणि खलनायकी भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका विशेष गाजल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दशावतार कलेतील योगदानाबद्दल त्यांना झी गौरव पुरस्कार, माझा लोकराजा महोत्सवात सन्मान तसेच २०२० मध्ये राज्यस्तरीय सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने कोकणच्या पारंपरिक दशावतार नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg