loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळे येथे तेली समाजाची यशस्वी संवाद बैठक संप्पन्न

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ यांच्या वतीने चंद्रकांत ठावरे यांच्या निवासस्थानी शामदत्त लाँज गणपतीपुळे रत्नागिरी येथे गणपतीपुळे,मालगुंड, निवेंडी,रिळ परिसरातील तेली समाज बंधुभगिनींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, शहराध्यक्ष अमोल लांजेकर, उपाध्यक्ष निलेश कोतवडेकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण झगडे, सेवा आघाडीचे काशिनाथ सकपाळ, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक राऊत, जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीला सुरुवात करताना म.प्रा. तै.म.सेवा आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत नाव विशेष प्रभाव असलेले समाज बांधव विनायक राऊत यांनी बैठकीचा उद्देश सागून उपाध्यक्ष पंढरीनाथ पवार व चंद्रकांत ठावरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे संघटन, सध्याची वाटचाल, हाती घेण्यात आलेले समाज भवनचे काम, पतपेढी या सर्व विषयांचा मागोवा घेत सचिन लांजेकर, दिपक राऊत, रघुवीर शेलार यांनी संवाद साधला. उपाध्यक्ष राजेंद्र रसाळ गुरुजी, मनोज महाडिक, चंद्रकांत ठावरे यांनी चर्चेत सहभागी होत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व सुरवात करताना चंद्रकांत ठावरे गणपतीपुळे यांनी ५५५१/ रु.राकेश महाडिक सरपंच रिळ १५०००/- रु. मनोज महाडिक रिळ ५५५५/-रु. बैठकीतच देऊन आत्मविश्वास वाढवला.

टाईम्स स्पेशल

ही बैठक पंढरीनाथ पवार, चंद्रकांत ठावरे, विनायक राऊत, राकेश महाडिक, राजेंद्र रसाळ, अशोक राऊत, शिवाजी राऊत, विठोबा राऊत, रविंद्र ठावरे, मनोज महाडिक, जयवंत ठावरे, मोहन ठावरे, अमोल राऊत, महेश ठावरे, अनंत राऊत, गजानन ठावरे, राजेंद्र सिताराम रसाळ, संतोष शेट्ये नेवरे इत्यादींनी प्रत्यक्ष मेहनत घेऊन व आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून यशस्वी केली. शेवटी नारायण झगडे गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानत धन्यवाद दिले व बैठक संपल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg