loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडली-चिपळूण एसटी बसला शिर आंबेकर धारवाडी येथे अपघात, ८ प्रवासी किरकोळ जखमी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : कुडली-चिपळूण एसटी बसला आज सकाळी शिर आंबेकर धारवाडी या ठिकाणी अपघात झाला. सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस १० ते १२ फूट रस्ता सोडून रस्त्याच्या खाली घसरली. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या एसटी बसमध्ये एकूण १४ प्रवासी प्रवास करीत होते, त्यापैकी ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करून सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले. ही बस कुडली मधून सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटली होती.

टाईम्स स्पेशल

जखमी प्रवाशांमध्ये तायरा जांभारकर (कुडली), राखी हरचकर, अपूर्वा वासावे, भाग्यश्री हरचकर, प्रतिभा हरचकर, दर्शनी पावरी, सुमिता सुर्वे, साधना पवार, सुभाष राठोड, गणेश दोडके यांचा समावेश असून सर्व जखमींची माहिती डॉक्टर तेजल मोहिते यांनी दिली. या अपघाताचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg