loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. रुक्मिणी शिर्के यांचे निधन

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे माहेर असलेल्या आणि मुंबईतील आग्रीपाडा येथे वास्तव्यास असलेल्या कै. रुक्मिणी कृष्णा शिर्के यांचे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने देव्हारेसह मुंबईतील नातेवाईक व आप्तस्वकीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्या कै. गोपाळ हरी देवळेकर यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कै. रुक्मिणी शिर्के यांनी मुंबईतील नायर रुग्णालयात सेवा बजावत रुग्णसेवेचे कार्य केले. प्रेमळ, ममताळू आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी कुटुंबीय व परिचितांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी मायेचा आधार गमावला आहे. त्यांच्या पश्चात भाऊ गंगाराम देवळेकर, भाचा-भाची, पुतणे, जावई, मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg