loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रशांत पाटेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

डोंबिवली : भारतीय जनता पार्टीच्या डोंबिवली पश्चिम मंडलाचे सरचिटणीस प्रशांत पाटेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रशांत पाटेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या जनसेवेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास या कार्यालयाची मदत होईल.

टाईम्स स्पेशल

या उद्घाटनप्रसंगी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रियाताई जोशी, भाजपा जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, भाजयुमो कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे प्रशांत पाटेकर यांच्या जनसंपर्क आणि जनसेवेच्या कार्याला नवी सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg