loader
Breaking News
Breaking News
Foto

एन दुष्काळाच्या तोंडावर कडवई धरणाच्या लिकेजमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या भिंतीला आणि सांडव्याला असणार्‍या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. गेली चार वर्षे असणारा लिकेजमुळे एन दुष्काळाच्या तोंडावर पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट श्यक्यता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अंतर्गत लघुपाटबंधारे विभाग दक्षिण रत्नागिरीच्या अखत्यारीतील कडवई येथील धरण हे या परिसराच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ५.५० चौ किमी असून लांबी २६५ मी आहे. धरणाची उंची २५.५० मिटर आहे. बुडीत क्षेत्र २४.२९ हेकटर असून पाण्याचा साठा १.६६९ द.ल.घन मिटर आहे. धरण होण्यापूर्वी गावामध्ये पाणी टंचाई असायची पण गेली ५० वर्षे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी या धरणामुळे वाढली असल्याने पाणी टंचाई दूर झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली चार वर्षांपासून या धरणाच्या सांडव्याच्या तोंडावर तसेच मुख्य भिंतीला गळती लागल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. ही गळती काढण्यासाठी लाखोंची टेंडर काढून पैशाची उधळपट्टी करण्यात आली मात्र गळती जैसे थे असल्याचे दिसून येते. प्रतिवर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने या गळतीचा प्रभाव इथल्या पाणीटंचाईवर फारसा पडला नाही. मात्र यावर्षी पाऊस कमी असून दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने धरणातून वाहून जाणारे हे पाणी चिंतेचा विषय बनले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी यावर आवाज उठवला आहे. महिनाभरापूर्वीच दुष्काळसदृश परिस्थितीत धरणाची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती या धरणाची पाहणी करून गेल्याचे समजते. सांडव्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने सांडव्यातुन होणारा पाण्याचा विसर्ग हा त्याच्या आवाजावरूनच लावावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धामापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता सदरचा लिकेज काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न झाल्याचे संगीतले. मात्र तो म्हणवा तसा यशस्वी झाला नसल्याचे सांगितले. सांडव्यातून किंवा भिंतीतून पाण्याचा विसर्ग होत असला तरी त्यामुळे गावाला पाणीटंचाई होईल, असे वाटत नाही. मात्र काही प्रमाणात पाणी वापरावर निर्बंध घालावे लागण्याची श्यक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सांडव्यावर वाढलेली झाडी लवकरच तोडली जाईल, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतीकडूनही संबंधीत विभागाला याबाबत ग्रामस्थानच्या मागणीवरून कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग याना लेखी पत्र देण्यात आले असल्याची माहिती ग्रामधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg