loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती संदीप सुर्वेंचा राजीनामा; वर्षभराच्या कार्यकाळात बाजार समितीला नवी दिशा

रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे सुर्वे यांनी सांगितले आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुर्वे यांनी आपल्या कार्यकाळात बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाजार समितीचे उत्पन्न वाढावे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीच्या माध्यमातून अधिक सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी नाके सुरू करण्याबरोबरच आठवडे बाजार सुरू करण्याच्या दृष्टीने सुर्वे यांनी प्रयत्न केले. बाजार समितीची कार्यालये सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे अल्प कालावधीचा कार्यकाळ असला तरी बाजार समितीच्या विकासासाठी केलेले त्यांचे प्रयत्न लक्षात राहणारे ठरले आहेत. सुर्वे यांच्या राजीनाम्यानंतर आता नवा सभापती कोण? याची उत्सुकता बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. नव्या सभापतीची निवड कोणाच्या नावावर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाईम्स स्पेशल

या निवडीचा निर्णय जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता चोरगे यांच्या निर्णयाकडे बाजार समितीतील संचालकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सभापती म्हणून संदीप सुर्वे यांचा कार्यकाळ वर्षभराचा असला तरी बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी नाके, आठवडे बाजार आणि कार्यालये सुरू करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची चर्चा होत आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतरही सुर्वे यांचा सभापतीपदाचा कार्यकाळ बाजार समितीच्या दृष्टीने लक्षात राहणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg