loader
Breaking News
Breaking News
Foto

केळंबे गावात कचरा टाकण्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, २५ नोव्हेंबरच्या आमसभेत मुद्दा गाजणार

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर):लांजा नगरपंचायतीकडून केळंबे गावाच्या हद्दीत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. वारंवार सांगूनही नगरपंचायतीकडून कचरा टाकणे बंद केले जात नसल्याने केळंबे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत हा गंभीर विषय उपस्थित केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा नगरपंचायतीने शहरातील संकलीत केलेला कचरा केळंबे गावातील जागेत आणून टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट न लावता कच-याला थेट आग लावली जात आहे.हवेत प्रदुषण वाढत आहे यासंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीही नगरपंचायत प्रशासनाला कचरा टाकणे बंद करण्याची विनंती केली होती. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून अद्यापही कचरा टाकणे सुरूच आहे.

टाइम्स स्पेशल

या निष्क्रियतेविरोधात जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत हा मुद्दा लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील लेखी पत्र लांजाचे गटविकास अधिकारी गिरी यांना देवेंद्र वालकर,अभिजीत राजेशिर्के,सहदेव झोरे,गजानन झोरे आदीसह ग्रामस्थांनी विषय मांडण्यासाठी परवाणगिची मागणी केली आहे. आता या आमसभेत काय निर्णय होतो आणि नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg