loader
Breaking News
Breaking News
Foto

होमगार्ड विश्‍वास कुळ्ये यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशाचे प्राण वाचविल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन

रत्नागिरी - रत्नागिरी रेल्वे स्थानकात राजधानी एक्स्प्रेस गाडी फलाटावर येत असताना प्रवासी निशू रामवीर सिंह (रा. पाडावेवाडी रत्नागिरी) हे गाडीत चढत असताना गाडी व फलाट यांच्यामधील गॅपमध्ये अडकल्याचे निदर्शनास येताच होमगार्ड विश्‍वास कुळ्ये (सनद क्र. ७७३) यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ सदर व्यक्तिस सुरक्षितपणे बाहेर काढले. विश्‍वास कुळ्ये यांच्या धाडसी व कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी रेल्वे प्रवासी ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण मगदूम यांनी तत्परता, समयसूचकता, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल प्रशंसा केली असून एका अनमोल प्रवाशाचा जीव वाचवल्याबद्दल त्यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या धाडसी व कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg