loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई - गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ मच्छिचा ट्रक पलटी

लांजा (संजय साळवी) - दापोलीहून गोव्याच्या दिशेने मच्छी घेऊन जाणारा ट्रक मुंबई - गोवा महामार्गावरील तालुक्यातील आंजणारी पुल येथे पलटी झाला. यामध्ये ट्रकमधील मच्छीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली येथून मच्छी घेऊन गोव्याकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच ०८ डब्ल्यू ४६८६ ) मुंबई - गोवा महामार्गावर आंजणारी पूल येथे पलटी झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रक चालक सुदीप दुबे (२५ वर्षे, उत्तर प्रदेश) हा किरकोळ जखमी झाला. मात्र अपघातामध्ये मच्छीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामधील जखमी ट्रकचालक सुदीप दुबे याला अधिक उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg