loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्षा कटिबद्ध; कामकाजात माझा कोणताही हस्तक्षेप नाही: लखमराजे भोसले

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नगराध्यक्षांकडे स्पष्ट व्हिजन असून, नागरिक आणि नगरसेवकांच्या सहकार्यातून त्या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी व्यक्त केला. श्रद्धाराजे भोसले या उच्चशिक्षित आणि कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा असून, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही किंवा नगरपरिषदेच्या कामकाजात माझा कोणताही हस्तक्षेप नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ​नगरपालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चा आणि आरोपांवर पत्रकारांशी बोलताना लखमराजे भोसले म्हणाले की, "श्रद्धाराजे भोसले माझी पत्नी असली तरी नगरपरिषदेचे निर्णय त्या स्वतः घेतात. पक्ष पदाधिकारी आणि शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून मी केवळ सूचना करू शकतो. वैयक्तिक कामासाठी कोणी माझ्याकडे आल्यास मला पक्षाचा पदाधिकारी म्हणून लक्ष द्यावे लागते; परंतु नगरपरिषदेवर माझा कोणताही दबाव अथवा हस्तक्षेप आहे या चर्चेत तथ्य नाही."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मोती तलावातील वाढत्या प्रदूषणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या १० ते १५ वर्षांत तलावाच्या परिसरात इमारती उभ्या राहिल्या असून, सांडपाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक यावर योग्य तो मार्ग काढतील. तसेच पाणीपुरवठा, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत नागरिकांची जी भूमिका आहे, तीच आमचीही भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. ​यंदा पाऊस लांबल्यामुळे रस्त्यांच्या कामांना विलंब झाला असला, तरी सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाणी आणि गॅस पुरवठा सुरळीत मिळण्यास कायम प्राधान्य दिले जाईल. भविष्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेसाठी शासनाने तज्ज्ञांची टीम नेमली असून, ती योजना सक्षमपणे पूर्ण व्हावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असे भोसले म्हणाले.

टाईम्स स्पेशल

शहरातील वाहनांची वाढती वर्दळ ही पर्यटनात वृद्धी होत असल्याचे लक्षण आहे. शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासकीय मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होईल. सावंतवाडीच्या विकासाकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असून, पर्यटन विकास, मोती तलाव स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले व नगरपरिषद प्रशासनाचा सकारात्मक पाठपुरावा राहील, असा पुनरुच्चार लखमराजे भोसले यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg