loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर एस.टी. स्टँडजवळ चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या मुंबईतील संशयिताला हत्यारांसह अटक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर एस.टी. स्टँड परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह फिरणार्‍या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. संतोष चंद्रकांत राणे (वय ४९, रा. दामूनगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:०२ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर एस.टी. स्टँड परिसरातील एका टपरीच्या आडोशाला एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी त्याची पाहणी व चौकशी केली असता, आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरीसाठी लागणारी विविध हत्यारे जवळ बाळगून असल्याचे निष्पन्न झाले.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार योगेश दशरथ शेटये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष राणे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg