loader
Breaking News
Breaking News
Foto

बालमावळ्यांच्या हातून साकारला शिवरायांचा तेजस्वी इतिहास; पानवळ घवाळीवाडी येथील किल्ला बनवणे स्पर्धेत ६५ चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास घरोघरी नांदावा, प्रत्येक बालमावळ्याचे हात किल्ला बांधण्यासाठी मातीत भरले जावेत आणि प्रत्येक बालमनावर शिवरायांचे तेजस्वी जीवन संस्कार रुजले जावेत, या उदात्त हेतूने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय, पानवळ घवाळीवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बनवणे स्पर्धेचा निकाल रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या या स्तुत्य उपक्रमाला यंदाही गावातील चिमुकल्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, सुमारे ६० ते ६५ मुलांनी वैयक्तिक आणि गटागटाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेच्या निमित्ताने गावातील बालगोपाळांनी माती व दगडांचा वापर करून एकापेक्षा एक सरस आणि हुबेहूब किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. केवळ किल्ले उभारण्यावरच न थांबता, या बालमावळ्यांनी परीक्षकांसमोर आणि ग्रामस्थांसमोर आपण साकारलेल्या किल्ल्यांचा गौरवशाली इतिहासही अत्यंत आत्मविश्वासाने कथन केला. चिमुकल्यांच्या या कलेचे आणि इतिहासाच्या जाणिवेचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी आयोजन गावप्रमुख संदिप घवाळी, गावचे उपसरपंच रविंद्र मांडवकर, ग्रामपंचायत सदस्या श्वेता मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण कांबळे, पिंट्या मांडवकर, दिपक मांडवकर, रूपेश घवाळी, निलेश घवाळी, सचिन तांबे, सचिन मांडवकर, प्रमोद मांडवकर आणि दिनेश घवाळी यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या बालमावळ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, वाचनालयाच्या या उपक्रमामुळे गावात दिवाळीच्या सणात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg