loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा वैभव वसाहत परिसरात वीजवाहिन्या जमिनीला टेकत आल्या, मात्र महावितरणचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये तीव्र संताप!

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील वैभव वसाहत परिसरात लांजा-कोर्ले रस्त्यालगत महावितरणचा अत्यंत जीवघेणा आणि बेजबाबदार कारभार समोर आला आहे. येथील वीज वाहिन्या अक्षरशः जमिनीला टेकत आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या वाहिन्यांमध्ये सध्या विद्युत प्रवाह पूर्णपणे चालू असल्यास यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित यंत्रणांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक दिवसांपासून या वीज वाहिन्या सैल होऊन जमिनीला टेकण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. या विजवाहिन्यांना वेलींनी अक्षरश: वेढून घेतले आहे. वाढलेल्या झाडीतून विजवाहीन्या गेल्या असल्याने स्पष्ट दिसून येत नाहीत. या परिसरातून नागरिक, लहान मुले आणि पाळीव प्राण्यांची सतत वर्दळ असते. एखादा अनावधानाने या तारांच्या संपर्कात आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांना याबाबत वारंवार तोंडी सांगितल्याचे बोलले जात आहे. परंतु, ’कुठलीतरी मोठी दुर्घटना घडण्याची अधिकारी वाट पाहत आहेत का?’ असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

टाईम्स स्पेशल

या विज वाहिन्यांच्या पोलवर स्ट्रीट लाईट पेटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजवाहिनी जीवंत असल्याचे बोलले जात असुन या परिसरात भीतीचे वातावरण आहे. संबंधित वीजवितरण कंपनीने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी या वाहिन्या तातडीने उंचावर कराव्यात आणि वीज खांब दुरुस्त करावेत, अशी मागणी लांजावासीय करत आहेत. जर याकडे दुर्लक्ष केले आणि भविष्यात काही जीवितहानी झाली, तर त्याला पूर्णपणे महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांतून दिला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg