loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत न्यायालयाचा मनाई आदेश असूनही भर नागरीवस्तीत फटाक्यांची आतिषबाजी

​सावंतवाडी, (प्रतिनिधी): प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे शासनाचे आवाहन असताना आणि रुग्णालयांच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करणारे न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, सावंतवाडीत त्याचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मोती तलावाकाठावरील केशवसुत कट्टा आणि उपजिल्हा रुग्णालयाशेजारील फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत याठिकाणी फटाक्यांचा कचऱ्याचा मोठा ढीग तसाच पडून होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्यायालयाच्या आदेशानुसार फटाक्यांच्या आतषबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सावंतवाडी पोलिसांना आधीच पत्र देऊन सतर्क केले होते. मात्र, पोलिसांनी या गोष्टीची साधी दखलही घेतली नाही. विचारणा केली असता, "फटाके कुठे फोडावेत आणि कुठे नाही, याचे झोन ठरवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असून त्यांनी तशी खबरदारी घेतली पाहिजे," अशी संतापजनक भूमिका पोलिसांनी घेतली. पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलून आपली पाठ शिवून घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत असून, याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी बरेगार यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, ज्याठिकाणी ही आतषबाजी झाली त्याच्या अगदी शेजारी उपजिल्हा रुग्णालय आणि आयुर्वेद महाविद्यालयीन रुग्णालय आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध गंभीर आजारांचे रुग्ण उपचार घेत आहेत. अचानक झालेल्या कर्णकर्कश फटाक्यांच्या आतषबाजीमुळे या आजारी रुग्णांची आणि विशेषतः गरोदर मातांची काय धाकधूक उडाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. ​प्रशासन आणि पोलिसांच्या या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg