loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांची पहिलीच आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली पहिलीच आमसभा अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेमध्ये विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आणि आक्षेपांना आमदार सामंत यांनी अत्यंत संयमाने, अभ्यासपूर्ण आणि समर्पक उत्तरे देत उपस्थितांची मने जिंकली. लांजा तालुक्याची आमसभा शहरातील पाटीदार भवन येथे पार पडली. यावेळी आमदार, किरण सामंत, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, लांजा तालुका सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोलकर, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हापरिषद उपाध्यक्ष विलास चाळके, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, आदी व्यासपीठावर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमसभेच्या सुरुवातीला देशातील सर्व मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तालुक्यातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि वीज, एसटी बस, जमिन विषयक, भूमिअभिलेख सदर्भातील तक्रारी, लांजा नगरपंचायत संसंदर्भातील विकास कामे, तसेच लांजा तालुक्यातील दारूधंद्या विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी विरोधी गटातील सदस्यांनी व नागरिकांनी काही मुद्दे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार किरण सामंत यांनी कोणतीही कटुता न ठेवता सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. प्रत्येक प्रश्नावर प्रशासकीय अधिकार्‍यांकडून तत्काळ खुलासा घेत त्यांनी कामाच्या सद्यस्थितीची अचूक माहिती सभागृहासमोर मांडली व अधिका-यांना जनतेच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

टाईम्स स्पेशल

राजकारणापलीकडे जाऊन मतदारसंघाचा विकास करणे हेच आपले मुख्य ध्येय आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार सामंत यांनी यावेळी मांडली. विरोधकांच्या विधायक सूचनांचे स्वागत करत त्यांनी प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी देत आमदार सामंत यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना कामाचा वेग वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पहिल्याच आमसभेत आमदारांनी दाखवलेली अभ्यासू वृत्ती, हजरजबाबीपणा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यपद्धती यामुळे उपस्थितांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार किरण सांमत यांनी लांजा नगरपंचायतीसह तालुक्यात विविध ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त करून दिल्याबद्दल आमदार सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आले. या आमसभेला विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg