loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण कट्टा येथे चोरट्यांचा धुमाकूळ! कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यारात्री आठ बंद बंगले फोडले!

मालवण दि प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी परिसरातील निसर्गनगरी येथे अज्ञात चोरट्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री धुमाकूळ घालत एकाच वेळी आठ बंद बंगल्यांना लक्ष्य केले. या बंगल्यांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यातील एका बंगल्यातून ३० हजार रुपयांची रोकड आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरट्यांनी लंपास केले. एकाच रात्री आठ बंद बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, कट्टा येथील वरची गुरामवाडीमधील निसर्गनगरी परिसरात अनेक बंगले असून, त्यापैकी काही बंगले सध्या बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री या बंगल्यांना लक्ष्य केले. तारी, कनयाळकर, दळवी, फाटक, मोरे, सावंत, पवार आणि गिरकर यांच्या बंगल्यांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.या घरफोड्यांमध्ये गिरकर यांच्या आईच्या बंगल्यातून ३० हजार रुपयांची रोकड आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरीला गेले. अन्य बंगल्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, एकाच परिसरातील तब्बल आठ बंद बंगल्यांना लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.या घरफोड्यांमध्ये गिरकर यांच्या आईच्या बंगल्यातून ३० हजार रुपयांची रोकड आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे चोरीला गेले. अन्य बंगल्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, एकाच परिसरातील तब्बल आठ बंद बंगल्यांना लक्ष्य करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

टाइम्स स्पेशल

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम, मालवणचे पोलीस निरीक्षक दीपक शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, सुहास पांचाळ, सद्दामहुसेन मुल्ला यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित बंगल्यांची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, श्वानपथक बंगले असलेल्या परिसरातच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून काही ठशांचे नमुने गोळा केले आहेत. या नमुन्यांच्या आधारे तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या मदतीने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, एकाच रात्री आठ बंद बंगले फोडण्यात आल्याने निसर्गनगरी परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः काही दिवस किंवा महिने बंद राहणाऱ्या बंगल्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी नियोजनपूर्वक या बंगल्यांना लक्ष्य केले का, तसेच या घरफोड्यांमागे एकाच टोळीचा हात आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, बंद बंगल्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घरफोड्यांमागील चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान आता मालवण पोलिसांसमोर आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg