loader
Breaking News
Breaking News
Foto

हातखंबा जिल्हा परिषद प्रभागात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष सभेचे आयोजन, १५ ऑक्टोबरपर्यंत जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचे नियोजन

रत्नागिरी, (हातखंबा), (प्रतिनिधी) : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद प्रभागात यावर्षी उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पर्यंत ग्रामपंचायत पालीच्या सभागृहात तातडीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. हातखंबा जि.प. समाजकल्याण सभापती ऍड. सुयोग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेला पंचायत समिती हातखंबा गणाच्या सदस्या सौ. विद्या बोंबले, पंचायत समिती पाली गणाच्या सदस्या डॉ. पद्मजा कांबळे यांच्यासह प्रभागातील नाणीज, कशेळी, खाणू, साठरे, पाली, वळके, वेळवंड, चरवेली, हातखंबा, कापडगाव आणि निवळी या गावांतील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक, ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, उमेद बचत गटाच्या प्रतिनिधी, सीआरपी प्रभाग संघाचे पदाधिकारी, प्रभाग समन्वयक कोळेकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्रीमती प्राजक्ता नागवेकर, शाळांचे मुख्याध्यापक, तलाठी, पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ठोस उपाययोजना राबविण्याबाबत या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जास्तीत जास्त वनराई बंधारे, कच्चे बंधारे व इतर आवश्यक बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील योग्य जागांची पाहणी करून तातडीने कामाला सुरुवात करावी, असे निर्देश देण्यात आले. प्रभागातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात १५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करावे. त्यासाठी दुसर्‍या दिवसापासूनच संभाव्य ठिकाणांची पाहणी करून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याचे ठरविण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि या लोकसहभागाच्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

तसेच, प्रत्येक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा सविस्तर कृती आराखडा तयार करून तो दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पंचायत समिती, रत्नागिरी येथे सादर करावा, ऍड. सुयोग कांबळे यांनी दिल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे, भूजलपातळी सुधारण्यास मदत करणे आणि आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, हा प्रमुख उद्देश आहे. सभेच्या शेवटी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg