loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून कोसुंब-सोंडवाडी येथे बंधारा उभारणी

खेड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘मिशन बंधारे २०२६’ या जलसंवर्धन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निर्मल ग्रामपंचायत कोसुंब आणि दादासाहेब सरफरे विद्यालय व आर्ट्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, बुरंबी–शिवने यांच्या संयुक्त विद्यमाने कोसुंब-सोंडवाडी येथे बंधारा बांधण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविणे, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि जलसंधारणाचे महत्त्व समाजात रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंवर्धनाचा अनुभव घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित सहभागातून लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला ग्रामविकास अधिकारी सुभाष घडशी, कृषी अधिकारी अंतेश्वर सुस्तरफोड, माजी उपसरपंच दिनेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कोसुंब-सोंडवाडी येथील ग्रामस्थ पंढरीनाथ जाधव, राजेंद्र जाधव, संतोष जाधव, घनश्याम जाधव, विजय जाधव, महेंद्र कानाल आणि विजय रेवाळे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, शिक्षक संदीप जाधव, सुनील पवार, सुहास गेल्ये, राकेश. बांद्रे, वैद्य, सूरज जाधव, सुरेंद्र कुळेय, यादव, बोथरे, लिपिक मंगेश जाधव, शिक्षकेतर कर्मचारी जयवंत घवाळी आणि राजेंद्र जाधव यांच्यासह इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या बंधारा बांधणीच्या कार्यात मोलाचे योगदान दिले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि उपस्थितांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था कोसुंब ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. ग्रामपंचायतीने केलेल्या या सहकार्यामुळे उपक्रमात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली. ग्रामपंचायत आणि विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg