loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण बीचवर आज रंगणार ‘देवधून’ भक्तिसंगीताची मैफल!

मालवण (प्रतिनिधी) - समुद्राच्या लाटांचा नाद आणि भक्तिसंगीताचे मधुर सूर यांचा अनोखा संगम आज, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी मालवणच्या सागरकिनारी अनुभवायला मिळणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘बीच कला महोत्सव – मालवण’ अंतर्गत ‘देवधून’ या भक्तिसंगीताच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ७.३० वाजता मालवण बीच येथे ही संगीत रजनी रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भक्ती, संगीत आणि सुरांच्या माध्यमातून रसिकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात भक्तिरसपूर्ण संगीताचा आस्वाद घेण्याची संधी यानिमित्ताने मालवणकरांसह पर्यटकांनाही मिळणार आहे. बीच कला महोत्सवाच्या माध्यमातून मालवणच्या पर्यटनाला सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड मिळत असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी विविध कलाविष्कार अनुभवण्याची पर्वणी उपलब्ध होत आहे. ‘देवधून’ या कार्यक्रमातून भक्तिसंगीताची सुरेल मैफल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या भक्तिसंगीत सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक प्रणय तेली यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg