रत्नागिरी ( प्रतिनिधी ): रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये यावर्षीही नवरात्रोत्सवा निमित्त घटस्थापना रवि. दि. 11 ऑक्टो. पासून विजयादशमी मंगळ. दि. 20ऑक्टो. पर्यंत ‘देवी तुळजाभवानी नवरात्रोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तुळजाभवानीच्या या नवरात्रोत्सवात भरगच्च कार्यक्रम संपन्न होतील. रत्नागिरीतील श्रीराम मंदिराचे प्रांगणात असलेले श्री देवी तुळजाभवानीचे देवस्थान हे एक जाज्ज्वल्य व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. या तुळजाभवानी देवस्थानमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही घटस्थापना रवि. दि. 11 ऑक्टो. ते दसरा मंगळ. दि. 20 ऑक्टो. पर्यंत तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव संपन्न होईल. घटस्थापनेला रवि. दि. 11 ऑक्टो. रोजी सकाळी देवी तुळजाभवानी समोर पारंपारिक घटाची स्थापना, अभिषेक व आरती संपन्न होईल व त्यानंतर देवस्थान भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येईल. सायं. ठिक 6 वा. श्री विठ्ठल रखुमाई रंगीतसंगीत कन्या मेळा (संयोजिका युक्ता तोडणकर) हा बहारदार कार्यक्रम तुळजाभवानीच्या दरबारात सादर होईल.गुरु. दि. 15 ऑक्टो. व शनि. दि. 17 ऑक्टो. रोजी देवी तुळजाभवानी समोर विविध पथकांचे ‘कन्या मेळे’ सादर करण्यात येतील. त्यानंतर बुध. दि. 14 व सोम. दि. 19 रोजी दांडीयाचे कार्यक्रम संपन्न होतील. यामध्ये भगिनी ग्रुप व मिक्स ग्रुप असे दोन्ही पध्दतीने दांडीया कार्यक्रम सादर करण्यात येतील.
त्याचबरोबर सोम. दि. 12 ऑक्टो. रोजी विद्यार्थी वर्गाचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, नाट्यछटा व फॅन्सी ड्रेस कार्यक्रम संपन्न होतील. मंगळ. दि. 13 ऑक्टो. रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.शुक्र. दि. 16 ऑक्टो. रोजी देवीचे स्तोत्र राजश्री लोटणकर सादर करतील. त्यानंतर सायं. 5 ते 7 या वेळेत भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायं. 5 ते 7 या वेळेत ‘कुमारिका पूजन’ हा विशेष कार्यक्रम संपन्न होईल. गुरु. दि. 15 ऑक्टो. रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत भगिनींचा भोंडला हा कार्यक्रम पेश करण्यात येणार आहे. तसेच रवि. दि. 18 ऑक्टो. रोजी सायं. 5 ते 7 या वेळेत भरतनाट्यम्, कथ्थक नृत्याविष्कार हा कार्यक्रम कु. आकांक्षा हिराकांत साळवी आणि त्यांच्या शिष्या सादर करतील. त्याचबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम ‘सखी भगिनी मंडळ’च्या सौ. माया तांबे आणि त्यांच्या सहकारी भगिनी सादर करतील. सोम. दि. 19 ऑक्टो. रोजी पानाफुलांची रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.विजयादशमीचे दिवशी मंगळ. दि. 20 ऑक्टो. रोजी ‘राजेशाही दसरा’ हा भारदस्त सोहळा संपन्न होईल. तसेच विविध पारितोषिक विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. यावेळी सर्वांसाठी ‘सोने लुटणे’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहार व चहापान होऊन श्री तुळजाभवानी देवस्थानातील नवरात्रोत्सवाची सांगता होईल.या नवरात्रोत्सव व राजेशाही दसरा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यासाठी आज श्रीराम मंदिराचे प्रांगणात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संयोजन समिती स्थापन करण्यात आली ती पुढीलप्रमाणे- 1) श्री. सुनील नलावडे 2) श्री. नित्यानंद दळवी 3) श्री. उपेंद्र सुर्वे 4) श्री. दीपक देसाई 5) श्री. संतोष रेडीज 6) सौ. मंदाकिनी चौगुले 7) सौ. अर्चना उतेकर 8) सौ. विशाखा सुर्वे 9) सौ. माया तांबे 10) सौ. यज्ञा वीरकर 11) सौ. नंदिनी चाकणे 12) सौ. सायली झापडेकर 13) सौ. संगिता येलफुले 14) सौ. वैजयंती पाटील 15) सौ. प्रतिक्षा साळवी 16) सौ. सुरेखा घोरपडे 17) सौ. साक्षी भागवत 18) श्री. विनायक हातखंबकर 19) श्री. संजय वैशंपायन 20) श्री. राजाराम सुर्वे 21) श्री. राकेश चव्हाण 22) श्री. संदीप डोंगरे 23) श्री. रमाकांत पांचाळ सर 24) श्री. देवदत्त पेंडसे 25) श्री. राजेंद्र वीरकर 26) श्री. अशोक आंबवकर 27) श्री. विनायक चव्हाण 28) श्री. प्रकाश शिंदे 29) श्री. पी. डी. सावंत 30) श्री. विजय सुर्वे 31) श्री. प्रकाशराव शेंडे 32) श्री. सुधाकरराव सावंत.या तुळजाभवानी देवस्थानात स्वहस्ते ओटी भरण्यासाठी येणार्या भगिनींना ओटीचे साहित्य सुलभरित्या मिळावे याकरिता देवस्थानतर्फे नाममात्र सवलतीचे दरात ओटीची व पुजेची तबके देवस्थानात उपलब्ध असतील. त्यामुळे भगिनी वर्गाची फार मोठी सोय होते. भगिनींच्या व भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानतर्फे ही सुविधा उपलब्ध आहे. रत्नागिरीतील या तुळजाभवानी देवस्थानमध्ये दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी येणार्या सर्व भगिनींना व भाविकांना तुळजाभवानीचा पारंपारिक प्रसाद म्हणजे सुक्या मेव्याचा प्रसाद देण्यात येतो. देवी तुळजाभवानी देवस्थान हे राजेशाही देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. त्यामुळे या देवस्थानमध्ये भाविकांना देण्यात येणारा प्रसाद हा सुक्या मेव्याचा असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात म्हणजे घटस्थापना रवि. दि. 11 ऑक्टो.पासून दसरा मंगळ. दि. 20 ऑक्टो.पर्यंत रत्नागिरी येथील या तुळजाभवानी देवस्थानमध्ये सर्व भगिनींना देवीची ओटी स्वहस्ते भरण्याची संधी देण्यात येते. भगिनी आपल्या हाताने देवीची पूजा करुन स्वहस्ते ओटी भरु शकतात. नवरात्रोत्सवाच्या काळात हे तुळजाभवानी देवस्थान स. 8.00 पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांसाठी खुले असते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांसाठी नावनोंदणी करण्याकरिता संपर्क - 1) पाककला स्पर्धा (मंगळ. दि. 13 ऑक्टो.)-1) सौ. विशाखा सुर्वे-9604055603 2) सौ. मंदाताई चौगुले-9423875114 2) रांगोळी स्पर्धा (सोम. दि. 19 ऑक्टो.)- 1) श्री. विनायक हातखंबकर सर-9970323545 2) सौ. माया तांबे-9545235225 3) मेहंदी स्पर्धा (सोम. दि. 19 ऑक्टो.)- 1) सौ. यज्ञा वीरकर-9970567383 (वरील सर्व स्पर्धांसाठी श्री. सुनील नलावडे-9822385084 यांचेकडेही नांवनोंदणी करता येईल.)






































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)


















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.