loader
Breaking News
Breaking News
Foto

करुणा पदयात्रेतील पर्यावरणदूत अयान बॅनर्जी यांचे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) - पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, निसर्गाप्रती करुणेची भावना आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्याची जिद्द मनाशी बाळगून भारताच्या किनारपट्टीलगत हजारो किलोमीटरची पदयात्रा करणारे २४ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ते अयान बॅनर्जी यांनी रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धन, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि निसर्गाप्रती आपली जबाबदारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच व्हेगन आहाराबाबत जनजागृती करणे या उद्देशाने अयान बॅनर्जी हे ‘करुणा पदयात्रे’अंतर्गत भारताच्या किनारपट्टीलगत सुमारे ७ हजार किलोमीटरचा पायी प्रवास करीत आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून ते पर्यावरण रक्षण, प्राणीमात्रांप्रती करुणा आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांच्या आगमनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळणे, निसर्गस्नेही सवयी अंगीकारणे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या विचारांमुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशील राहण्याची आणि सामाजिक जबाबदारी जपण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमप्रसंगी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, रोटरी सदस्य करुणाकरण आणि वैद्य उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वतीने अयान बॅनर्जी यांचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अयान बॅनर्जी यांच्या पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या या प्रेरणादायी कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg