loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालणार! ​माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची भिती आहे, तर दुसरीकडे सावंतवाडी नगर परिषदेची तब्बल ५७ कोटी रुपये खर्चाची नळ पाणी योजना काम गेल्या सात महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. हे काम नेमके का बंद राहिले, याची स्पष्ट कारणे मुख्याधिकाऱ्यांनी जाहीर करावीत. येत्या आठ दिवसांत जर नळ पाणी योजनेचे काम पुन्हा सुरू झाले नाही, तर मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी दिला आहे. ही योजना रखडणे अत्यंत क्लेशदायक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सावंतवाडी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेवक अजय गोंदावळे , नगरसेविका शर्वरी धारगळकर , ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक व पदाधिकारी बंटी पुरोहित उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पत्रकारांशी बोलताना संजू परब म्हणाले की, "गेल्या सात महिन्यांपासून ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचे काम रडखडले आहे. जेथे खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली होती, तेथे रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता पाहता ही योजना वेळेत पूर्ण झाली असती, तर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता. कंत्राटदाराकडे आवश्यक साहित्य आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध असतानाही, नगरपरिषदेकडून काम नळपाणी विभागाचे काम रोखून धरणे योग्य नाही." ​याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी योग्य आणि समाधानकारक उत्तरे देणे टाळले, असा आरोप परब यांनी केला. त्यामुळे पुढील आठ दिवसांत नळ पाणी योजनेचे काम पूर्ववत सुरू न झाल्यास नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा ठाम इशारा त्यांनी या वेळी दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg