loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरोली खाडीकिनारी कथित अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा; महसूल विभागाने तातडीने चौकशी करावी!

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील उमरोली खाडीकिनारी कथितरीत्या अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा परिसरात होत असून, या प्रकारामुळे खाडीचे नैसर्गिक अस्तित्व आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सेक्शन पंप व बोटींच्या सहाय्याने तसेच पोकलेन यंत्राच्या माध्यमातून वाळू उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाची महसूल विभागाने तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरोली खाडी परिसरात सेक्शन पंप आणि बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याची चर्चा आहे. तसेच पोकलेनच्या सहाय्याने डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचेही सांगितले जात आहे. खाडीपात्रात भराव करून वाळू उत्खननासाठी जागा तयार केली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. मात्र, या कामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खाडीपात्रातील अनियंत्रित वाळू उत्खननामुळे किनार्‍याची धूप, पाण्याच्या प्रवाहात बदल, जलचरांच्या अधिवासावर परिणाम आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाडी हा स्थानिक जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असल्याने अशा प्रकारच्या उत्खननावर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उमरोली खाडीकिनारी सुरू असल्याची चर्चा असलेल्या वाळू उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून उत्खननासाठी देण्यात आलेल्या परवानग्या, मंजूर क्षेत्र, उत्खननाचे प्रमाण, सेक्शन पंप व पोकलेनचा वापर, डंपर वाहतूक तसेच खाडीपात्रात करण्यात आलेल्या भरावाची तपासणी करण्यात यावी. उत्खनन अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्ती व यंत्रणांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

शासनाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे उमरोली खाडीतील कथित वाळू उपशाप्रकरणी केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. खाडीपात्राचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी महसूल विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg