loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील वाकेड येथे पादचारी पुलाचे गर्डर यशस्वीपणे बसवले; महामार्गाच्या कामाला गती

लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळत असतानाच तालुक्यातील वाकेड येथे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पादचारी पुलाच्या उभारणीचा कामाला वेग आला आहे. या पुलावरील चारही काँक्रीट गर्डर बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने खांबांवर अचूकपणे बसविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाकेड परिसरातील नागरिक, विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडताना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन या पादचारी पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पुलामुळे महामार्ग ओलांडण्यासाठी नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. या पादचारी पुलावर दोन्ही बाजूना प्रत्येकी दोन असे एकूण चार मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत. एका बाजूचे दोन गर्डर मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात आले असून उर्वरित दोन गर्डरही बुधवारी ७ ऑक्टोबर बसविण्यात आल्याची माहिती ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गावरील उड्डाणपूल गणेशोत्सवाच्या काळात तब्बल १४ वर्षांनंतर वाहतुकीस खुला झाला. त्यानंतर आता वाकेड येथील पादचारी पुलाचे कामही वेगाने सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या महिनाभरात पादचारी पूल नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे वाकेड परिसरातील महामार्ग ओलांडण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg