रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान जरी झालो, तरी आपण शेवटी जनतेचे सेवक आहोत. याच भावनेने शहराची सेवा केल्यास लोकप्रतिनिधींना अतिशय उज्ज्वल भविष्य आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. भाईंदर येथील उत्तन परिसरात आयोजित शिवसेना नगरपालिका, नगरपंचायत, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. आपल्या भाषणात मंत्री उदय सामंत म्हणाले की, जनतेच्या मनातील भावना आणि शहरातील समस्या जाणून घेऊन काम करणे हे प्रत्येक नगराध्यक्षाचे कर्तव्य आहे. थेट नगराध्यक्ष निवडून येण्याच्या पद्धतीमध्ये अनेकदा सर्व नगरसेवक एका पक्षाचे आणि नगराध्यक्ष दुसर्या पक्षाचा असतो. लोक केवळ पक्षाच्या जीवावर नाही, तर उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कर्तृत्वाला मतदान करतात, हे यावरून स्पष्ट होते.
त्यामुळे नगराध्यक्षांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम केले पाहिजे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यातील संबंधांवर बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्याधिकारी प्रशासनाचा प्रमुख असला, तरी संपूर्ण यंत्रणेचे प्रमुख नगराध्यक्ष असतात. यासाठी नगराध्यक्षांनी कायद्याचा अभ्यास करून आपल्या अधिकारांची योग्य माहिती ठेवली पाहिजे. अभ्यासू आणि सक्षम नगराध्यक्षाला कोणतीही राजकीय शक्ती रोखू शकत नाही. शहरापुढील आगामी आव्हानांवर प्रकाश टाकताना त्यांनी पाणी टंचाई आणि पर्यावरण संरक्षणाचा विषय प्रामुख्याने मांडला. विशेषतः मराठवाड्यातील आणि दुष्काळी भागातील शहरांमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, केवळ दिखाव्यासाठी किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण न करता, ती झाडे जगवणे आणि शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फळझाडे व सावली देणारी झाडे लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या शिबिराला रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, चिपळूणचे नगरध्यक्ष उमेश सकपाळ, लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप, दापोली नगराध्यक्षा कृपा घाग, खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला, खेड उपनगराध्यक्ष सतीश चिकणे आदी उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.