loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री कुलदैवत उत्सवात पं. उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय संगीताची लाभणार सुरेल मैफल

पनवेल :- कुलदैवतावरील श्रद्धा, भक्तिभाव आणि संगीताची सुरेल अनुभूती देणारा पळस्पे येथे श्री कुलदैवत उत्सव २०२६ हा गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. गवळी व चोरघे परिवाराच्या वतीने आयोजित या उत्सवानिमित्त रात्री ८ वाजता शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संगीत मैफलीत प्रसिद्ध गायक, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी आपल्या सुमधुर गायनातून रसिकांना स्वरानंदाची अनुभूती देणार आहेत. त्यांच्यासोबत गायिका ज्ञानेश्वरी गाडगे, संवादिनीवादक कार्तिकी गाडगे, तबलावादक प्रसाद पाध्ये, पखवाज वादक रायगडभूषण गुरुवर्य तालमणी पं. प्रतापराज पाटील आणि टाळवादक गरुडदास कदम हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मनोहर मडके करणार आहेत. कुलदैवत उत्सवानिमित्त आयोजित या भक्तिमय संगीत सोहळ्याचा लाभ सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळींसह घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg