देवगड (प्रतिनिधी) : नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा गणपती म्हणून भाविकांमध्ये श्रद्धास्थान असलेल्या देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील शिवकालीन खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू असून, मनोभावे दर्शन घेत भाविक सुख, समाधान, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रींच्या चरणी साकडे घालत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने तारामुंबरी परिसर दुमदुमून जात आहे. पंचक्रोशीसह दूरवरून भाविक खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी येत असून, दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. तारामुंबरीचा खवळे महागणपती यंदा ३२६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तब्बल तीन शतकांहून अधिक काळाची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. २१ दिवस चालणार्या या अनोख्या गणेशोत्सवात श्रींचे तीन वेगवेगळ्या रूपांत दर्शन घडते, हे या गणपतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाल्याचे सांगितले जाते.
खवळे महागणपतीची मूर्ती बाहेरील मूर्तिकाराकडून तयार करून घेतली जात नाही. खवळे कुटुंबातील सदस्यच पिढ्यान्पिढ्या ही मूर्ती घडविण्याची परंपरा जपत आहेत. सूर्यकांत खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय खवळे, विकट खवळे, चिन्मय खवळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी यंदाची मूर्ती साकारली आहे. खवळे परिवाराच्या नवव्या, दहाव्या आणि अकराव्या पिढीतील सदस्य या परंपरेत सहभागी होत आहेत. या मूर्तीसाठी शेतातील सुमारे दीड टन माती आणली जाते. लाकडी घणाने माती मळून तिचे गोळे तयार केले जातात. श्रावण पौर्णिमेपासून मूर्तीनिर्मितीला सुरुवात होते. ठराविक अंतराने टप्प्याटप्प्याने मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे कोणत्याही साच्याचा वापर न करता संपूर्ण मूर्ती हाताने घडविली जाते. त्यामुळे ही मूर्ती पूर्णपणे भरीव असून, बैठ्या स्वरूपातील मूर्तीची उंची सुमारे पावणेसहा फूट आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी महागणपतीच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून विधिवत पूजा केली जाते. त्यावेळी केवळ श्रींचे डोळे रंगविले जातात. दुसर्या दिवशी उंदराची पूजा करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. हा नैवेद्य शेतातील समाधीस्थळाजवळ ठेवण्याची परंपरा आहे. तिसर्या दिवसापासून मूर्तीच्या रंगकामाला सुरुवात होते आणि पाचव्या दिवशी रंगकाम पूर्ण केले जाते.
श्रींच्या मूर्तीवर लाल रंग, चंदेरी अंगरखा, पिवळे पितांबर, सुमारे दीड फूट उंचीचा सोनेरी मुकुट आणि त्यावर पाच फणी नाग अशी आकर्षक सजावट केली जाते. पाठीमागे गोल कागदी पंखा आणि हातावर शेला अशी पारंपरिक सजावटही केली जाते. या गणेशोत्सवातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीच्या रंगरूपात टप्प्याटप्प्याने होणारा बदल. सातवा, अकरावा, पंधरावा, सतरावा आणि एकविसावा दिवस अशा विविध टप्प्यांवर मूर्तीच्या रूपात बदल केले जातात. त्यामुळे २१ दिवसांच्या उत्सवात भाविकांना श्रींचे तीन वेगवेगळ्या रूपांत दर्शन घेता येते. यंदा चंद्रकांत खवळे आणि लक्ष्मी खवळे यांच्या हस्ते महागणपतीची विधिवत पूजा करण्यात आली. खवळे महागणपतीबाबत पंचक्रोशीत विविध श्रद्धा प्रचलित आहेत. विशेषतः अपत्यप्राप्ती आणि विवाहासाठी केलेला नवस श्री पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विसर्जनाच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दुपारच्या सुमारास भाविकांकडून पावलेले नवस फेडले जातात, तसेच नवीन नवस बोलले जातात. दररोज भाविकांची दर्शनासाठी होणारी मांदियाळी, परिसरात घुमणारा ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि तीन शतकांहून अधिक काळापासून सुरू असलेली परंपरा यामुळे तारामुंबरीचा खवळे महागणपती भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र बनला आहे. २१ दिवसांचा उत्सव पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने खवळे महागणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.