देवळे (प्रकाश चाळके) - देवरुखनजीक साडवली- सह्याद्रीनगर येथील सुवर्णकार धनंजय केतकर यांच्या अपहरण व लूट प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या आणखी चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. महेश राया मोरे (वय ३३) व तेजस रघुनाथ तांडेल (वय ३१) यांना कल्याण येथून, दशरथ मारुती साळुंखे (वय ३९) याला बदलापूर येथून, तर सचिन खुडे (वय ४३) याला बारामती येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली एर्टिगा कारही सचिन खुडे याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील आरोपींची संख्या १३ झाली आहे. चारही आरोपींना बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईमुळे देवरुख पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. देवरुख-साखरपा मार्गावरील वांझोळे परिसरात १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता धनंजय केतकर यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांच्याकडील सुमारे १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर धक्काबुक्की करून त्यांना वाटूळ येथे नेऊन सोडण्यात आले होते.
सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या या अपहरणाच्या कटामुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर देवरुख पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुखमध्ये ठाण मांडून तपासावर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान साखरपा येथील दोन स्थानिक व्यक्तींवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची माहिती उघड झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई, बदलापूरपर्यंत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी टप्प्याटप्प्याने कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली होती. यामध्ये प्रणित दुधाणे (वय ३०, रा. संगमेश्वर), राजेश नवाले (वय ३५, रा. संगमेश्वर), विशाल आचार्य (वय ४५, रा. बदलापूर), दीपक लोहिरे (वय ३६, रा. बदलापूर), सन्नी ठाकूर (वय ३३, रा. बदलापूर) आणि क्रिश अँथोनी (वय २१, रा. बदलापूर) यांचा समावेश आहे. यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी श्रीनिवास आचार्य आणि सागर कदम यांची जामिनावर सुटका झाली आहे. फरार आरोपींचा शोध घेताना पोलिसांनी मोबाईल सीडीआर, एसडीआर तसेच बँक स्टेटमेंटचा बारकाईने अभ्यास केला. या तांत्रिक तपासाच्या आधारे फरार आरोपींचे ठिकाण निश्चित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
फरार आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. एक पथक पुणे येथे, तर दुसरे पथक मुंबई परिसरात रवाना करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, नितीन जाधव, प्रशांत मसुरकर, हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, चालक सचिन पवार, सचिन लगारे आणि सुहास लाड या पथकातील पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकांनी समन्वयाने कारवाई करत चारही फरार आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी एर्टिगा कारही जप्त करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून रमिझ शेख यांनी तांत्रिक विश्लेषण केले. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी रिव्हॉल्वरही जप्त केला आहे. वर्षभरापासून फरार असलेल्या चार आरोपींना अखेर जेरबंद करण्यात आल्याने या अपहरण प्रकरणाच्या तपासातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. देवरुख पोलिसांच्या या कारवाईचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.