चिपळूण (ओंकार रेळेकर) - "कोण म्हणतो देणार नाय,घेतल्याशिवाय राहणार नाय!" "मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या मालकीची!" " "मुंबईच्या वैभवात योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत!" अशा गगनभेदी घोषणा देत, गिरणी कामगारांनी आणि त्यांच्या वारसांनी आज लालबाग परिसर दणाणून सोडले. ८ ऑक्टोबर रोजी विधान परिषदेचे उपनेते सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अप्पर गृहसचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत सचिवस्तरावरील बैठकीत, छोट्या-छोट्या भूखंडाचे एकत्रिककरण करून गृहसंकुल उभे करणे, गिरणी कामगार संकुलातील संक्रमण,शिबिरातील घरे गिरणी कामगारांना देणे, बांधलेल्या घरांची सोडत काढणे, एनटीसी गिरण्यांच्या जागा ताब्यात घेणे इत्यादी मुंबईत उपलब्ध होणाऱ्या घरांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र १९ ऑक्टोबरच्या शासकीय निर्णयात महामुंबईतील,(एमएमआरडीए) खाजगी विकासाच्या प्रकल्पातील घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देण्याचा शासकीय निर्णय(GR) काढण्यात घाला.या शासकीय निर्णयात उर्वरित घरांसाठी मुंबईत जागा नसल्याचाही उल्लेख आहे,ही गोष्ट ८ तारखेच्या बैठकीशी विसंगत आणि कामगारांमध्ये निराशा निर्माण करणारी आहे, या कृतीचा १६ कामगार संघटनांच्या बैठकीमध्ये निषेध करण्यात येऊन, सरकारने या कृतीचा फेर विचार करावा.गिरणी कामगारांनी आयुष्यभर घाम गाळून मुंबईला वैभव संपन्न केलं आहे.
स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना घरांसाठी जागा नाही म्हणणे, त्यांची घोर निराशा आहे.तेव्हा शासनाने या गोष्टीचा फेर विचार करावा. यासाठी लालबाग, भारतमाता येथे आज कामगार आणि वार सांचे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले .३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सह्याद्री अतिथीग्राहात कामगार प्रतिनिधी आणि सरकारच्या बैठकीत मुंबईत घरे देण्याच्या मागणीला सरकारने अनुकूलता दर्शवली होती.त्या अगोदरच्या अनेक बैठकांमध्ये मुंबईत घरे देण्याला अनुकूलता दर्शवण्यात आली होती.संघटनेने मागणी केल्याप्रमाणे सरकारने घरे उपलब्ध करून दिली तर मुंबईत मोठ्या प्रमाणात घरे मिळू शकतील मात्र सरकारची मानसिकता असावयास हवी, असे संघटनांनी म्हटले आहे.लढा समितीचे निमंत्रण आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष निवृत्ती देसाई, सर्व श्रमिक संघटनेचे कॉम्रेड उदय भट, गिरणी कामगार सेनेचे सत्यवान उभे आणि बाळ खवणेकर, हेमन धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, एनटीसी कामगार असोसिएशनचे ऍड बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, गिरणी कामगार सभेचे हरिनाथ तिवारी, मुंबई गिरणी कामगार युनियनचे ऍड.अरुण निंबाळकर, बजरंग चव्हाण, कामगारनेते स्व.दत्ता ईश्वलकर स्मृती मंचच्या वैशाली गिरकर,मनीषा पेडामकर,उज्वला निकम इत्यादींनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती लावून पाठिंबा दिला होता.
आंदोलनाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या,१) मुंबईचे वैभव वाढविणाऱ्या गिरणी कामगारांना घरे मिळालीच पाहिजे, २)एनटीसी च्या जागा राज्य सरकारने ताब्यात घेऊन घरे बांधावीत, ३)इंदू मिलच्या जागेवर म्युझियमची जागा वगळून उर्वरित जागेवर घरे बांधावीत,४) सेंचुरी मिलच्या ६ एकर जागेवर घरे बांधावीत,५) खटाव मिलची जागा आणि खटाव बोरिवली येथील जागा घर बांधणीसाठी द्यावी, ६) रिपेरिंग बोर्ड,एसआरए पुनर्विकासात एक एफएसआय देऊन घरे बांधावीत. ७) संक्रमण शिबिरातील उपलब्ध जागेवर घरे द्यावीत,८) गिरण्यांच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात १ एफ एसआय वाढवून अतिरिक्त घरे द्यावीत,९) म्हाडाच्या ५६ वसाहतीत १ एफएसआय वाढवून घरे द्यावीत, ११)बीपीटीच्या जागेचा उद्योगपतीं ऐवजी प्राधान्याने गिरणी कामगारांच्या घरासाठी विचार करावा, १२) एनटीसी कडे शिल्लक असलेला ७ लाख टी डीआर कामगारांच्या घरांसाठी वापरावा, १३) न्यू ग्रेट आणि स्प्रिंग मिल येथील तयार घरांची सोडत तातडीने काढावी, १४) ज्या वंचित कामगारांनी म्हाडाचे अर्ज भरले नाहीत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी द्यावी, १५) गिरणी आमदार घर बांधणीसाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून त्याला कायद्याचे स्वरूप द्यावे. १६) खार जमिनी गिरणी कामगार घरासाठी मिळाव्यात.असे झाले तर १ लाख २५ हजार कामगारांना घरे देणे अशक्य नाही. गिरणी कामगारांच्या घरांसाठीचा लढा कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नसून तो त्यांच्या घरांच्या हक्कासाठी आहे, असे लढा समितीच्या वतीने निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.