loader
Breaking News
Breaking News
Foto

सैनिक नागरी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय ७०० कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट, सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सैनिक नागरी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय ४५० कोटी पर्यंत पोहचला असून तो ७०० कोटी पर्यंत पोहचला पाहिजे म्हणून उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तसेच सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी वार्षिक बैठकीत सभासदांना दिली. सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सिंधुदुर्ग या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गोविंद चित्रमंदीर, सावंतवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेपुढील विषय व वार्षिक अहवालसह विविध विषयांचे वाचनासह अवलोकन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ यांनी सभागृहा समोर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन २०२५-२०२६ या कालावधीत संस्थेने १ कोटी ३५ लाख एवढा नफा कमावला असुन, सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेने एकत्रित व्यवसाय ४५० कोटींचा केलेला असुन, आज ही पतसंस्था सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अग्रमानांकीत सहकारी संस्था मध्ये गणना केली जात आहे. सदर व्यवसाय ७०० कोटीपर्यंत नेण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर विविध उपकमांसाठी निधी ही उभे करण्यात आले. यामध्ये सभासदांच्या पाल्याच्या सत्कारासाठी गुणगौरव निधी, कर्मचारी वर्गासाठी सेवक कल्याण निधी, इमारत निधी, सिंधुदुर्ग जिल्हयातील शाळांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक सक्षमीकरण निधी, संचालक कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण निधी, सांस्कृतिक व सामाजिक उपकमासाठी शैक्षणिक अभ्यास दौरा निधी, ३५ वर्ष प्रतिपुर्ती यशोगाथा सोहळा निधी, निवृत्त सैनिक सन्मान सोहळा निधी, डिपॉझीट टार्गेट बक्षिस निधी, कर्मचारी स्नेह मेळावा निधी, मयत सभासदांच्या अंत्यविधी कार्यासाठी निधी, कर्मचारी प्रोत्साहन भत्ता अशा विविध निधीची उभारणी चालु वर्षामध्ये करण्यात आलेली असुन, या निधीतुनच पुढील काळात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपकम हाती घेण्यात येणार आहेत.

टाईम्स स्पेशल

सभासदांच्या ज्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आहे, अशा सर्व पाल्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांना यावेळी उत्तरे दिली व सभासदांनी केलेल्या सहकार्यबद्दल धन्यवाद व्यक्त केले व पुढील वर्षापासुन सभासदांचे अहवाल त्या त्या विभागातील शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असुन, डिजीटल स्वरूपात अहवाल पाठविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यामुळे भविष्यात संस्थेवर अहवाल छपाई व पाठविण्याचा खर्च हा अधिक प्रमाणात वाचणार असुन, संस्थेला फायदा होऊन अधिक नफा वाढु शकतो, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सर्व सभासदांचे व हितचिंतकांचे आभार संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शामसुंदर सावंत, संतोष मुसळे, बाबु वरक, शांताराम पवार, गोपाळ बाईत उपस्थित होते. तसेच संस्थेचे अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg